
‘हुंदाई मोटर इंडिया’ ने नुकताच भारतीय बाजारातील ‘हुंदाई एक्सटर एक्स्टेर कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ गाडीचा खुलासा केला आहे. कंपनीने आधीच ११ हजार रुपयाच्या टोकन अमाउंटवर ‘हुंदाई एक्सटर’ साठी नोंदणी सुरू केली आहे. ही गाडी जुलैदरम्यान बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.
‘हुंदाई एक्सटर’ गाडीची भारतीय बाजारातील सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ६ लाख रुपये असू शकते. बाजारपेठेत दाखल झाल्यावर या गाडीची टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रोंक्स या गाड्यांशी स्पर्धा होईल.
‘हुंदाई एक्सटर’च्या छायाचित्रामध्ये बॉक्सी प्रोपोर्शन आणि एच आकाराचे एलईडी डीआरएल सोबत एक स्ल्पिट हेडलँम्प सेट दिसत आहे. रियरमध्ये अपराइट टेलगेट, टेल लँम्प आणि एच आकाराची एलईडी लायटिंग दिली आहे. कंपनीने अजूनपर्यंत गाडीच्या आतील बाजूचा खुलासा केलेला नाही.

या गाडीला दोन इंजिन पर्याय दिले जातील. ज्यात एक १.२ लीटरचा कप्पा पेट्रोल इंजिन आणि एक १.२ लीटर बाय फ्यूल कप्पा पेट्रोल-सीएनजीचा समावेश आहे. ट्रान्समिशनमध्ये यात ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एएमटी यूनिट येईल.
‘हुंदाई एक्सटर’ ला ६ एअरबॅग्स असतील. ‘एक्स्टेर’मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट आणि ४० सेफ्टी फीचर्स मिळतील. स्टँडर्ड सेफ्टी फीचर्समध्ये ३ पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर, की लेस एन्ट्री, ईबीडी सोबत एबीएस, रियर पार्किंग सेन्सर, ईएसएस आणि बर्गलर अलार्मचा समावेश आहे.