
‘इंडिया फार्मा अँड इंडिया मेडिकल डिव्हाईस’ची आठवी आंतरराष्ट्रीय परिषद आज केंद्रीय रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये होत आहे. ‘फार्मास्युटिकल विभाग’ आणि ‘फिक्की’ यांच्या संयुक्त विद्यमाने या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात भारताला दर्जेदार उत्पादने तयार करणारे केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचा एक भाग म्हणून डॉ. मांडविया ‘राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण २०२३’ आणि ‘वैद्यकीय उपकरण निर्यात संवर्धन परिषदे’चा प्रारंभ यावेळी होणार आहे.
‘असिस्टन्स फॉर मेडिकल डिव्हाईसेस अँड क्लस्टर्स फॉर कॉमन फॅसिलिटीज’ नावाच्या नव्या योजनेचा देखील ते प्रारंभ करणार आहेत. या 2 दिवसीय परिषदेत औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रातील देश-विदेशातील ७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.