लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गटबाजी
उद्धव ठाकरे गटाची शिवसेना दावा करत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बहुतांश आमदार आणि खासदार 2024 च्या महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी मूळ पक्षात परत येऊ इच्छित आहेत.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दावा केला की, ‘शिंदे गटात सामील झालेल्या आमच्या एकूण 40 आमदारांपैकी 22 आमदार उद्धव ठाकरे गटात परत येण्याचा विचार करत आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर याउलट म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले अनेक आमदार आणि खासदार पक्ष बदलण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत आहेत. 2024 च्या निवडणुकीपूर्वी ते उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार आहेत. अशा पलायनानंतर शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील, असा दावाही त्यांनी केला आहे.