Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री इम्रान खान यांचा अडचणी वाढतच चालल्या आहेत. शाहबाज सरकार पीटीआयच्या नेत्यांवर आणि समर्थकांवर सातत्याने आपली पकड घट्ट करत आहे. दरम्यान, पीटीआयच्या आणखी 9 जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या लोकांवर ‘आर्मी ॲक्ट’ अंतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासह ‘आर्मी ॲक्ट’ आणि ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट’ अंतर्गत अटक करण्यात आलेल्या सदस्यांची संख्या 50 झाली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी पाकिस्तानात हिंसाचार निर्माण झाला होता. इम्रान खानच्या समर्थकांनी लष्करी तळ आणि सरकारी इमारतींची तोडफोड केली. पीटीआय समर्थकांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीची तोडफोड केली.

इम्रान खानच्या अटकेनंतर संतप्त जमावाने प्रथमच रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. हिंसाचारानंतर पीटीआय प्रमुखाच्या हजारो समर्थकांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरू झाली. या हिंसाचारात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने बुधवारी इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात 19 जूनपर्यंत 5 लाखांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *