कुस्तीपटूंवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
पहिलवानांच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईवरून सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, “केंद्र सरकार महिला खेळाडूंशी ज्या पद्धतीने वागत आहे, देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सरकारची हीच वृत्ती असेल का? ही मनुवादी राजवटीची सुरुवात आहे का?”

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधत त्यांनी दावा केला की, महिला खेळाडूंवरील अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ एफआयआर आणि अटक करण्याची तरतूद आहे.
खिलाडी महिलाओं पर अत्याचार के मामलों में तुरंत FIR और गिरफ्तारी का प्रावधान है। जिस तरह का बर्ताव केंद्र सरकार महिला खिलाडियों के साथ कर रही है, क्या देशभर में महिला अत्याचार के मामलों में सरकार का यही रवैया रहेगा? क्या ये मनुवादी शासन की शुरुवात है?#WrestlerProtest pic.twitter.com/9uZojcP6SS
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 1, 2023
अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवरून ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांसारखे भारतातील अव्वल दर्जाचे कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत गेल्या महिनाभरापासून निषेध करत आहेत. रविवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंवर कारवाई करताना या कुस्तीपटूंना जंतरमंतर येथून त्यांचे तंबू हटवले होते.