सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • शासकीय अनुदानाची व्‍यवसायांना मदत – मात्र, फिजिबिलिटी रिपोर्ट हवा

शासकीय अनुदानाची व्‍यवसायांना मदत – मात्र, फिजिबिलिटी रिपोर्ट हवा

by सह्याद्री मराठी वृत्त 15 November 2022 0 Comments
15Nov, 2022

गुणवत्तापुर्ण फिजिबिलिटी रिपोर्ट/ बिझनेस प्लॅन बँक कर्ज/ गुंतवणूकदारांकडून वित्त सहाय्याची कशी खात्री देतात?

१) फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय ?

फिजिबिलिटी रिपोर्ट/ व्यवहार्यता अहवाल हा कोणत्याही व्यवसायाचा एक महत्वपुर्ण दस्तऐवज असतो जो व्यवसायातील समस्या आणि संधीच्या संभाव्य उपायांचे मुल्यांकन करतो आणि पुढील व्यवसाय विश्लेषणासाठी या उपायांची व रणनीतीची व्यवहार्यता निश्चित करतो. व्यवसाय किंवा कोणताही प्रकल्प यशस्वी होण्याच्या शक्यता निश्चित करण्यासाठी संबंधित व्यवसाय/ प्रकल्पाच्या आर्थिक, तांत्रिक कायदेशीर व वेळापत्रकीय घटकांचा विचार करून त्यांचे विश्लेषण करतो.

याचे चार प्रकार असतात:

• ऑपरेशनल

• टेक्नीकल

• इकॉनॉमिक

• शेड्युल

फिजिबिलिटी रिपोर्टचा मुख्य उद्देश एखादा व्यवसाय किंवा प्रकल्प आपणास अपेक्षित निकाल/ रिझल्टस देईल का? तो यशस्वी होईल का? तो आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे का? सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे आवश्यक मनुष्यबळ, टुल्स, तंत्रज्ञान, संसाधने आहेत का? आपल्याला अपेक्षित परतावा (ROI) हा प्रकल्प मिळवून देईल काय? हे निर्धारित करणे हा असतो.

२) फिजिबिलिटी रिपोर्टचे व्यवसायातील महत्व :

कोणत्याही उद्योग/ व्यवसाय प्रकल्पाच्या विकासासाठी विशेषत: आर्थिक विकासासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट महत्वपूर्ण आहेत. ते उद्योग/ व्यवसाय प्रकल्प कधी कोठे व कसे ऑपरेट करावे हे निर्धारित करतात. ज्यामुळे ते संचलित करण्यासाठी किती वित्त आवश्यक आहे तसेच व्यवसाय प्रक्रियेत अडचणी उत्पन्न करणारी संभाव्य संकटे कोणती असू शकतात हे ओळखता येते. फिजिबिलिटी रिपोर्ट मार्केटींग रणनीती वर लक्ष केंद्रीत करतात. फिजिबिलिटी रिपोर्ट कोणताही प्रस्तावित उद्योग/ व्यवसाय प्रकल्प कशा प्रकारे पूर्णत: व्यवहार्य आहे याचे विश्लेषण करतो.

जेणेकरून त्या उद्योगात/ व्यवसाय प्रकल्पात गुंतवणूक करणे अत्यंत योग्य आहे याची खात्री बँका, खाजगी वित्तसंस्था किंवा गुंतवणूक दारांना देता येते. फिजिबिलिटी रिपोर्ट व्यवसायिकांनी वित्तसंस्था/ गुंतवणूक दारांसमोर सादर केलेल्या प्रस्ताव/ व्यवसाय संकल्पनेची व्यवहार्यता पडताळणी करतो. हा अहवाल व्यवसायातील रोख प्रवाह ओळखण्यास मदत करतो. फिजिबिलिटी रिपोर्ट हा सर्व व्यवसाय क्षेत्रांमध्ये प्रचलित आहेत. उदा. हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, मेडिकल इंडस्ट्रीयल, रियल इस्टेट, कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादी फिजिबिलिटीमुळे व्यवसायिकांची वेळ आणि पैसा यांची बचत होते व ते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतात.

३) फिजिबिलिटी रिपोर्ट बँकलोन / प्रोजेक्ट फायनान्स हमी कशी देतो? :

कोणत्याही नवीन स्टार्ट अप व्यवसायासाठी किंवा व्यवसाय विस्तार व विकासासाठी बँक कर्ज किंवा गुंतवणूक दारांकडून वित्त सहाय्य मिळविण्यासाठी सर्व आवश्यकता व कागदपत्रांसह संपूर्ण व्यवसाय संकल्पनेचे व्यवहार्यतेचे विश्लेषण करणारा अहवाल म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट/ प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे अनिवार्य असते. यामध्ये प्रस्तावित व्यवसायासाठी आवश्यक भांडवल संसाधने, गुंतवणूकीवरील परतावा इतर आर्थिक बाबींचे विश्लेषण केलेले असते. व्यवसाय संचलनासाठी किती पैसा लागेल, तो कोणत्या मार्गाने उपलब्ध होईल. व तो कसा खर्च होईल हे देखील पाहिले जाते. फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट व्यवसायाच्या आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रीत करते.

हा रिपोर्ट स्टार्टअप खर्च, ऑपरेटिंग खर्च रोख प्रवाहाचे मूल्यांकन व भविष्यातील कामगिरींचा अंदाज घेऊन प्रस्तावित स्टार्टअप/ व्यवसाय प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करते. गुंतवणूकदार किंवा वित्तसंस्था फिजिबिलिटी रिपोर्टचा अभ्यास करून वित्त करारातील जोखमीचे मूल्यांकन करतात. गुणवत्तापुर्ण सखोल विश्लेषणात्मक फिजिबिलिटी रिपोर्ट सर्व आर्थिक व जोखीम युक्त बाबींचे विश्लेषण व मूल्यांकन करून प्रस्तावित प्रकल्प कसा व्यवहार्य आहे, याची खात्री गुंतवणूकदार/ वित्त संस्थांना देतो. ज्या फिजिबिलिटी रिपोर्टनुसार प्रस्तावित प्रकल्पामधून गुंतवणुकीवरील परताव्याची आणि दीर्घकालीन यशाची गुंतवणूकदारांना किंवा वित्तसंस्थांना खात्री पटते त्याच प्रस्तावित व्यवसाय प्रकल्पांना त्यांचे वित्तसहाय्य मिळते.

Next
शेवगा पिकांमध्ये संजीवकांचा वापर, रोग व कीडनियंत्रण आवश्यक
November 15, 2022
Previous
भारत जगातील प्रथम क्रमांकाचा इलेक्ट्रिक वाहन निर्माता बनेल - नितीन गडकरी
November 15, 2022
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to शासकीय अनुदानाची व्‍यवसायांना मदत – मात्र, फिजिबिलिटी रिपोर्ट हवा?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !