भारतीय बाजारपेठेत एसयुव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये लोकांना अनेक बदल दिसत आहेत. त्यामुळे छोट्या कारच्या विक्रीत घट होत आहे. हे पाहता मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटासारख्या अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. या कंपन्या वाहनांमध्ये अपडेट आणत आहेत. टाटा नेक्सॉन, महिंद्रा एक्सयुव्ही ३००, रिनॉल्ट किंगर आणि ह्युंदाई व्हेन्यू या बाजारात एकूण चार लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही आहेत. येत्या काही दिवसांत ऑटोमेकर्स त्यांच्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्हीमध्ये अपडेट आणणार आहेत.
सप्टेंबर २०२३ च्या सुरुवातीला नव्या एसयुव्ही विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. महिंद्रा सबकॉम्पॅक्ट एसयूवी न्यू महिंद्रा एक्सयुव्ही 300 सन 2024 वर्षाच्या सुरूवातीला येऊ शकते. आतापर्यंत कंपनीने त्याची लाँच तारीख जाहीर केलेली नाही; परंतु त्याच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये बरेच बदल पाहिले जाऊ शकतात.