केटीएम ड्यूक ३९०

प्रीमियम बाईक निर्माता कंपनी केटीएम वाहनांबाबत भारतातील तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. केटीएमने आपले नवीन ‘केटीएम ड्यूक ३९०’ मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांनी या मॉडेलची नोंदणी सुरू केली आहे. ग्राहक 4499 रुपयांपासून आरक्षित करू शकतात. कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

कंपनीने गाडीला 399 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन जबरदस्त पॉवर जनरेट करू शकते. ते 44.25 बीएचपी पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6 स्पीड गियर बॉक्ससह जोडले आहे. नवीन केटीएम ड्यूक 390 मॉडेलमध्ये कॉल आणि म्युझिक कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 5 इंच टीएफटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, सी चार्जिंग पोर्ट यांसारखी अनेक आधुनिक फीचर्स देखील देण्यात आली आहेत. अटलांटिक ब्लू व इलेक्ट्रॉनिक ऑरेंज मेटॅलिक या दोन रंगात ही बाईक उपलब्ध असेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *