यामाहाची इशाऱ्यावर चालणारी बाईक

जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी यामाहाची दुचाकी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे, हे वेगळे सांगायला नको ! या कंपनीने हँडलबारशिवाय असणारा अनोखा बाईक प्रोटोटाइप मध्यंतरी आणला होता. त्याची रचनाच वेगळी होती. यामाहा कंपनीने या बाईकची संकल्पना पहिल्यांदा सन 2017 मध्ये सादर केली होती. काही महिन्यांपूर्वी या अनोख्या मोटरसायकलची झलक पहायला मिळाली. जणू काही ती जादूची बाईकच आहे ! म्हणजे ही बाईक फक्त हातवारे करून फिरते. तिची रचना पूर्णपणे वेगळी आहे. या विद्युत मोटरसायकलमध्ये चेहऱ्याची ओळख पटवण्याचेसुद्धा वैशिष्ट्य आहे, जे मालकाला सुरक्षा प्रदान करते. ‘मोटाराइड’ दुचाकी मानवी हाताच्या इशाऱ्यावर कार्य करते. यामध्ये हॅप्टिक उपकरण वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ती स्थिर राहते. यामाहाच्या स्वतःच्या ॲक्टिव मास सेंटर कंट्रोल सिस्टीम तंत्रज्ञानाचा वापर ही बाइक तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. कंपनीने विद्युत दुचाकीसाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तर या बाईकमध्ये ‘ऑटोनॉमस ड्रायव्हिंग’ तंत्रज्ञान प्रदान करण्यात आले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *