शाओमीचे नवीन सॉफ्टवेअर भारतात येणार

शाओमी आपले नवीन सॉफ्टवेअर भारतात आणत असल्याचे कंपनीने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले आहे. याकरिता कंपनीने ‘शाओमी 13 प्रो’ आणि ‘शाओमी पॅड 6’ ची निवड केली आहे. कंपनी 4 जानेवारीला आपली नवीनतम फोन मालिका म्हणजेच ‘रेडमी नोट १३’ लाँच करणार आहे. या कार्यक्रमात कंपनी भारतातील नवीन सॉफ्टवेअरच्या आगमनाविषयी माहिती देईल. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हायपर ओएस’ लवकरच भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. जानेवारी 2024 मध्ये फ्लॅगशिप ‘शाओमी 13 प्रो’ आणि ‘शाओमी पॅड 6’ सह रोल-आउट सुरू करेल. हे एक मानव केंद्रित सॉफ्टवेअर आहे. कंपनीचे हे सॉफ्टवेअर नवीन ओएस फोनपासून ते वेअरेबलपर्यंत आणि अगदी त्याच्या नवीन ईव्हीमध्येही वापरले जाईल. खूप पूर्वी, शाओमीने माहिती दिली होती, की ती त्याच्या जुन्या ओएसला हायपर ओएसने बदलत आहे. हे मानवी वर्तनावर आधारित असल्याचे कंपनीने म्हटले होते. आता कंपनी हे सॉफ्टवेअर भारतात आणण्याच्या तयारीत आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *