शशांकचे नवे घर

शशांक केतकर हा अभिनेता ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. तो मालिका, चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. या मालिकेने तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. नुकतेच शशांकने नवे घर घेतल्याची माहिती दिली आहे. शशांक गेल्या अडीच वर्षांपासून ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसत आहे. त्यानंतर तो हंसल मेहता यांच्या ‘तेलगी स्कॅम २००३’ या वेबमालिकेमध्ये दिसला होता.

शशांक केतकर हा समाजमाध्यमांवर नेहमीच सक्रीय असतो. तो चाहत्यांसाठी सतत छायाचित्रे आणि व्हिडीओ जोडताना दिसतो. काही दिवसांपूर्वी पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून त्याने नवी विद्युत कार खरेदी केली होती. आता त्याने नवे घर खरेदी केले. मात्र, याबाबत त्याने माहिती दिली नव्हती. नुकताच त्याने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. अभिनेता शशांक केतकरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नवे घर खरेदी केल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मी घराचे फोटो समाजमाध्यमावर टाकले नाहीत. कारण मला सतत फोटो टाकायला आवडत नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *