वन प्लसचे नवीन स्मार्टवॉच

वन प्लसची उत्पादनांचा समावेश भारतातील टॉप स्मार्टफोन ब्रँडमध्ये केला जातो. यासोबतच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टवॉचही आणत असते. यावेळी देखील कंपनी आपले नवीन स्मार्टवॉच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या डिव्हाइसचे तपशील समोर आले आहेत. वनप्लस वॉचच्या यशामुळे कंपनीला या डिव्हाइसच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यासोबतच कंपनीने आपल्या काही डिझाईन्सचा एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे. या स्मार्टवॉचचा गोलाकार आकार असून त्यात दोन बटणे दिसतील. वन प्लसने ‘ट्वीटर’वर एक पोस्ट केली असून लोकांना उत्पादन काय आहे याचा अंदाज घेण्यास आणि लॉच तारखेचा अंदाज घेण्यास सांगितले आहे .

कंपनीने पोस्टमध्ये म्हटले आहे की, फक्त ‘चुकीची उत्तरे’ स्वीकार्य आहेत आणि ‘सर्वोत्तम चुकीच्या उत्तराला बक्षीस मिळेल.’ ही स्पर्धा भारत, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील सर्व वापरकर्त्यांसाठी असेल. 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता ती बंद होईल. काहींच्या म्हणण्यानुसार ‘वन प्लस वॉच 2’ हे 26 फेब्रुवारीला सादर केले जाऊ शकते. तथापि, काहींचा असा विश्वास आहे, की 26 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत बार्सिलोनामध्ये होणाऱ्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024’ दरम्यान हे स्मार्टवॉच येऊ शकते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *