बडे मियाँ छोटे मियाँ

अभिनेता अक्षय कुमार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या प्रदर्शनासाठी तयारी करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ. आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या यात भूमिका आहेत. हा बिग बजेट चित्रपट ईदला म्हणजेच ९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

निर्माते आणि कलाकारांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर बुधवारी प्रदर्शित केला. हा चित्रपट संपूर्ण ॲक्शन आणि विनोदाने परिपूर्ण आहे. टीझरची सुरुवात स्फोट, हेलिकॉप्टर व क्षेपणास्त्रांनी होते. या चित्रपटात नायकांची म्हणजेच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री आहे.

या दोघांनीही या चित्रपटात लष्करी अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. यात टायगर श्रॉफचा आवाज येतो की, ‘दिल से सैनिक, मन से शैतान हैं हम’. त्यानंतर अक्षयचा आवाज येतो, की ‘बचके रहना हम से, हिंदुस्तान हैं हम!’. या संवादांनंतर अक्षय आणि टायगर हातात बंदूक घेऊन प्रवेश करतात. यानंतर टीझरमध्ये अनेक धमाकेदार ॲक्शन सीक्वेन्सही पहायला मिळतात. एकूणच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा टीझर खूपच दमदार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *