सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी ‘गॅलॅक्सी टॅब एस ६ लाईट-2024’ आवृत्ती सादर केली आहे. कंपनीने या टॅबलेटच्या लाँचबाबत कोणतीही माहिती अगोदर दिली नव्हती. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा टॅबलेट लिस्ट करण्यात आला आहे. हा टॅबलेट 2022 ची पुढील आवृत्ती म्हणून आणण्यात आला आहे. या टॅबलेटचा डिस्प्ले डब्लूयुएक्सजीए रिझोल्यूशन आणि एस-पेन सुसंगत आहे. याशिवाय, हे जुन्या मॉडेलप्रमाणेच डिझाइनसह येते. कंपनीने हा टॅबलेट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज पर्यायांसह सादर केला आहे. सॅमसंग टॅबलेटमध्ये 8 एमपीचा सिंगल रियर कॅमेरा आहे. शिवाय, हा डिव्हाइस 5 एमपी फ्रंट फेसिंग सेल्फी कॅमेऱ्यासह येतो.
टॅबलेटची बॅटरी 7,040एमएएच बॅटरीसह येते. एकदा चार्ज केल्यावर 14 तास चालते. हा सॅमसंग टॅबलेट एकेजी-ट्यून्ड ड्युअल स्पीकर आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह येतो. कंपनीने हा सॅमसंग टॅबलेट वायफाय आणि एलटीई व्हर्जनसह आणला आहे. हा टॅबलेट ऑक्सफर्ड ग्रे, मिंट आणि शिफॉन गुलाबी रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या टॅबलेटच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.