‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम करणारी मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे सूत्रसंचालन करीत आहे. तिने केदार जाधव, जयदेव उनादकट यांच्यासोबत आयपीएलचे होस्टिंग केले आहे. आपला अनुभव तिने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला आहे.
‘देवमाणूस’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. यात ऐश्वर्या नागेशने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ऐश्वर्याला आयपीएल होस्ट करण्याची संधी मिळाली आहे.
ऐश्वर्याने आयपीएल होस्ट करतानाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर जोडली आहेत. चाहत्यांनी ऐश्वर्याचे कौतुक करुन तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.