‘जर-तरची गोष्ट’ हे नाटक म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट हिची निर्मिती आहे. या नाटकाच्या प्रयोगांची शंभरी पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने प्रिया बापट हिने या नाटकासाठी गाणे गायले आहे. जे समाजमाध्यमांवर चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांना फार आवडलेले आहे. या नाटकाच्या प्रयोगावेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा फलक दिसतोच दिसतो.
या नाटकाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी या नाटकातील गाणे प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे संगीतप्रेमी कुठेही ऐकू शकतात.
हे एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभला आहे. या नाटकात अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले, पल्लवी अजय हे कलाकार आहेत.