अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा २’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या टीझर व्हिडीओमध्ये एकही संवाद नाही. मात्र, एक जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स दिसत आहे.
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या भूमिकांचे पोस्टर्स आधीच प्रदर्शित करण्यात आले होते. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
पुष्पा २’च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका ॲक्शन सीक्वेन्समध्ये साडी अवतारात दिसला आहे. ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाचा पहिला भाग सन २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत सामील होईल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती, असे एका मुलाखतीत निर्मात्यांनी म्हटले होते. आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.