सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • पशूपालनासाठी योजना

पशूपालनासाठी योजना

by सह्याद्री मराठी वृत्त 11 April 2024 0 Comments
11Apr, 2024

आता गाय-म्हशी, मेंढ्या-शेळ्या, कोंबड्या, मासे इत्यादींशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण करणे सोपे झाले आहे. सरकारने असे व्यवसाय सुरू करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्याला काही मिनिटांत पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.

किसान क्रेडिट कार्ड योजना सन २०१९ पासून पशुपालकांसाठी चालवली जात आहे; परंतु अनेक पशुपालक,कुक्कुटपालक किंवा मत्स्यपालकांकडे स्वतःची जमीन नाही, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. सन  २०२१  पासून  भूमिहीन शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे,
असा व्यवसाय करु इच्छिणारे पशुपालक पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आणि कृत्रिम रेतन केंद्रांना भेट देऊन फॉर्म भरू शकतात. फॉर्मसोबत आधार कार्ड, दोन छायाचित्रे व बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.तसेच कोणीही बँकेचे डिफॉल्टर नसावे.अशा लोकांना लाभ मिळणार नाही.त्यासोबतच पशुपालक सेवा केंद्रातूनही फॉर्म भरू शकतात. गाय-म्हशी,मेंढ्या- शेळी, कुक्कुटपालन, मासे आणि ससेपालन करु इच्छिणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १,६०,००० रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही कागदाची आवश्यकता नाही. जर एखाद्या पशुपालकाने १,६०,००० ते ३,२०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले, तर त्याला जनावरांचा विमा आणि तो कोठून खरेदी केला यासारखी बरीच माहिती बँकेला द्यावी लागते.  जर तुम्ही जून महिन्यापर्यंत कर्जाची परतफेड केली असेल तर  नंतर फक्त ४ टक्के व्याज आकारले जाते. जर तुम्ही जूननंतर कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला ७ टक्केपर्यंत व्याज द्यावे लागेल. जर तेच कर्ज सहकारी बँकेकडून घेतले असेल तर आणखी १ टक्का सवलत मिळते. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्ही भविष्यातही त्यासाठी अर्ज करू शकता.

 

Next
पर्यावरणपूरक पत्रावळी निर्मिती
April 11, 2024
Previous
सुपीकतेसाठी हिरवळीचे खत
April 11, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to पशूपालनासाठी योजना?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !