अबीर गुलाल

‘कलर्स मराठी’ वाहिनी टीआरपीत मागे पडल्यावर नवनव्या मालिका या वाहिनीवर येऊ लागल्या आहेत. नव्या विषयाच्या, नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहिनीवर ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा केचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत मोठी उत्कंठा दिसत आहे.

‘अबीर गुलाल’ मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार शुभ्रा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. शुभ्रा अतिशय श्रीमंत कुटुंबातून आली असून तिला काळा हा रंग आवडत नाही. अभिनेत्री पायल जाधव यात दिसणार आहे.

अभिनेत्री पायल जाधव हिची ही पहिलीच मालिका आहे. तिने ‘बापल्योक’ या चित्रपटात काम केले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *