अभिनेते-अभिनेत्रींची धडपड

सारा अली खानपासून ते जान्हवी कपूरपर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात थेट चित्रपटांमधून केली; परंतु 80-90 च्या दशकात असे घडले नाही. स्टार किड असले तरीही त्या काळात त्यांना खूप मेहनत करावी लागली. सलमान खान, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चनपासून ते अनुष्का शर्मापर्यंत सर्वजण कामाच्या शोधात असायचे. असे अनेक कलाकार आज ‘सुपरस्टार’ बनून लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत.

थेट पडद्यावर येण्याऐवजी त्यांनी टीव्ही जाहिरातींमधून करिअरची सुरुवात केली. नंतर या स्टार्सनी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. सलमान खानला जगभरात ‘भाईजान’ म्हणून ओळखले जाते, परंतु हे काम मिळविण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात एका सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीतून केली होती.

शाहिद कपूरने २१ वर्षांपूर्वी ‘इश्क विश्क’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटापासून या अभिनेत्याने पडद्यावर अधिराज्य गाजवले, पण त्यानंतर त्याला खूप संघर्ष करावा लागला. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याने लहानपणी एक जाहिरात केली होती, ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत अभिनेत्री आयशा टाकिया दिसली होती

ऐश्वर्या राय बच्चनने कॉलेजच्या काळात मॉडेलिंग आणि जाहिरातींनी सुरुवात केली होती. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पेन्सिल जाहिरातीतून केली होती. आमिर खान आणि महिमा चौधरी अभिनीत सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीतून तिला ओळख मिळाली

अनुष्का शर्माने सन 2008 साली बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, मात्र त्यापूर्वीही ती पडद्यावर दिसली होती. अनुष्का शर्माने 2004 साली ‘स्किन केअर’ जाहिरातींद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली. आज ती भारतातील अनेक ब्रँडचा चेहरा आहे

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *