वही उत्पादन

शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यालये अशा सर्व ठिकाणी वह्या तसेच मोठ्या रजिस्टरची गरज असते. याशिवाय व्यापारी लोक वह्यांचा उपयोग रोजचा हिशोब लिहिण्यासाठी करतात. आता शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढली असल्याने वह्यांची गरजही तेवढीच वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाढणारी मागणी विचारात घेता वही उत्पादन व्यवसायाला चांगला वाव आहे. या प्रकल्पात हजारो वह्यांचे उत्पादन घेतले जाते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी हे वह्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. आपण शाळा, महाविद्यालांतूनही वह्यांची ऑर्डर मिळवू शकता. स्टेशनरी दुकानात वह्या विक्रीसाठी ठेवू शकता. सरकारी कार्यालयातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी मिळवू शकता.
वह्यांसाठी कच्चा माल व बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. तसेच वह्या बनविण्यासाठी कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. वह्यांचे ठराविक आकार असतात.अगदी छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंतच्या या वह्या असतात. वह्या बनविण्यासाठी आधी कागद खरेदी करावा लागतो. सध्या स्वयंचलित यंत्रावर वह्या बनविल्या जातात. अर्ध स्वयंचलित यंत्रावर प्रिंटिंग, कटिंग व फोल्डिंग केले जाते. नंतर बाईडिंग करून वह्यांची विक्री केली जाते. संपूर्ण स्वयंचलित यंत्राद्वारेही वह्या बनविल्या जातात. या यंत्रांमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या व आकाराच्या वह्या जलदगतीने व मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. या व्यवसायासाठी स्वत:ची जागा नसेल तर भाड्याने जागा पहावी.यासाठी वीज, गरजेनुसार पाणीपुरवठा व मनुष्यबळही लागेल