थोडं तुझं आणि थोडं माझं

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच येत आहे. या मालिकेमधून शिवानी सुर्वे ही अभिनेत्री दिसणार आहे.
‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री शिवानी सुर्वे पोहोचली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता दिसणार आहे.

या मालिकेत ती ‘मानसी’ ही भूमिका साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न आहे. वडिलांचे स्वप्न मानसीला काही करुन पूर्ण करायचे आहे. दुसरीकडे कॉलेजमधील गायत्रीच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. जेव्हा मानसी पदवी परीक्षेत पहिली येते, तेव्हा वादास सुरुवात होते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *