लिंगमळा धबधबा

 

गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो. पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह. या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते. मुख्य लिंगमळा धबधबा, त्याच्या सुरुवातीला डोह, घनदाट डोह, घनदाट वृक्षराजीमधून जंगल भ्रमंतीचा येत असलेला सुखद अनुभव आणि सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ या हंगामात या धबधबा परिसराला भेट देणा-या पर्यटकांना होतेच. मुसळधार पावसामुळे ६०० फूट उंचीवरुन वेण्णा नदीत कोसळणारा लिंगमळा धबधबा महाबळेश्वर – वाई रस्त्यालगत लिंगमळा धबधबा पर्यटकांचं खास आकर्षण आहे पण सहजासहजी त्याचं दर्शन होत नाही.

दोन किलोमीटर पायपीट केली की धबधब्याचं असं नयनरम्य दृष्य नजरेस पडत. निसर्गाचं वरदान असलेला लिंगमळा धबधबा तीन टप्प्यात कोसळतो. असा तीन टप्प्यात कोसळणारा हा देशातला पहिलाच धबधबा आहे. पहिला टप्पा अडीचशे फूट, दुसरा टप्पा दोनशे फूट, तर तिसरा टप्पा दीडशे फूटाचा आहे. या प्रवासानंतर हा फेसाळणारा धबधबा वेण्णा आणि कृष्णा नदीत सामावतो.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *