अनन्याचा नवा चित्रपट

अनन्या पांडेला ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटासाठी खूप प्रशंसा मिळाली. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून तिने चित्रपट जगतात प्रवेश केला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने समाज माध्यमांच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती. आता पुन्हा एकदा अनन्या डिजिटल जगाची गोष्ट घेऊन येत असून तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘सीटीआरएल’ असे आहे. विक्रमादित्य मोटवाने या चित्रपटानचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 4 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. केशर आणि आंदोलन फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

हा एक थ्रिलर चित्रपट असून तंत्रज्ञानावर आधारित आहे. तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. ‘नेटफ्लिक्स इंडिया’ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडिओ जोडला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्हाला वाटते की तुमचा आनंद, नातेसंबंध, आयुष्य तुमच्या नियंत्रणात आहे, पुन्हा विचार करा.” या व्हिडीओमध्ये आपल्या प्रियकरासोबत आनंदी क्षण व्यतीत करणाऱ्या अनन्या पांडेचे आयुष्य क्षणार्धात बदलताना दिसते. तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीमध्ये ती अडकते.

विहान सामत हा मस्करेन्हासची भूमिका साकारत आहे. दोघेही एक रोमँटिक जोडपे आहे. समाजमाध्यमावर ते एकत्र सामग्री तयार करतात. ब्रेकअपनंतर त्यांचे आयुष्य बदलते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *