कमला हॅरिस यांनी उमेदवारी स्वीकारली

“मी सर्व अमेरिकेच्या नागरिकांचे अध्यक्ष होण्याचे वचन देते. मी देशाला एकत्र ठेवण्यासाठी काम करेन. मी अशी राष्ट्रपती होईन जी फक्त ऐकू शकत नाही तर समजू शकते,” अशी ग्वाही अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी दिली. शिकागो येथे झालेल्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी औपचारिकपणे स्वीकारली. याप्रसंगी त्यांनी आपल्या उमेदवारीबद्दल देशवासीयांना धीर दिला.
आपल्या उमेदवारीची घोषणा करताना कमला हॅरिस म्हणाल्या की, आता विजयासाठी एकत्र काम करण्याची वेळ आली आहे. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समर्थनाचे प्रतीक म्हणून त्यांच्या नावाचा जयघोष केला. हॅरिस यांनी पुढे सांगितले की,  गेल्या काही आठवड्यांमधील त्यांचा प्रवास कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आव्हानात्मक होता. या प्रवासाने त्यांना त्याच्या आईची आठवण करून दिली, ज्यांच्या प्रेरणेने हा टप्पा गाठण्याचे धैर्य दिले. आपला प्रवास आपल्या आईसारखाच आश्चर्यकारक आणि आव्हानात्मक आहे. आपणास तिची दररोज आठवण येत असल्याचे हॅरिस यांनी सांगितले.
यादरम्यान कमला हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही खरपूस समाचार घेतला. कमला हॅरिस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, उपराष्ट्रपतींनी गेल्या साडे तीन वर्षांत केवळ विधानेच केली आहेत. त्यांचे वक्तृत्व आता खूप जुने झाले आहे.  त्यांना खरोखरच बदल घडवून आणायचा असेल तर आधी आपले भाषण थांबवले पाहिजे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *