बोत्सवानामध्ये लक्षवेधी हिरा आढळला

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा बोत्सवानामध्ये सापडला आहे.  हा हिरा 2492 कॅरेटचा आहे.  बोत्सवानाची राजधानी गॅबोरोनपासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावरील खाणीतून हा हिरा काढला गेला आहे. ही खाण ‘लुकारा डायमंड’ या कॅनडाच्या कंपनीद्वारे लीज तत्वावर दिली आहे, जी हिरे उत्पादनात अग्रेसर आहे.

हा हिरा त्याच्या आकारमानामुळे आणि शुद्धतेमुळे अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. सन 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ‘कुलीनन’ हिऱ्याशी या हिऱ्याची तुलना केली जात आहे. ‘कुलीनन’  हिऱ्याचे वजन 3106 कॅरेट होते. तो आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा म्हणून ओळखला जातो. नंतर, या हिऱ्याचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करण्यात आले. यापैकी काही हिरे ब्रिटीश राजघराण्याचा मुकुट सुशोभित करण्यास वापरले.

या नवीन हिऱ्याचाही लिलाव कदाचित मोठ्या किंमतीत केला जाईल.  विविध दागिन्यांमध्ये किंवा संग्रहालयात तो वापरला जाईल. बोत्सवाना हा हिऱ्यांच्या उत्पादनात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. या प्रदेशात अनेक मोठे आणि दुर्मिळ हिरे आहेत.  हा हिरा बोत्सवाना देशातील खाण उद्योगाची प्रतिष्ठा आणखी वाढविणार आहे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *