
बांगलादेशची राजधानी ढाका येथे लष्कराची आपत्कालीन बैठक झाली. लष्कराच्या शिफारशीवरून राष्ट्रपती मुहम्मद युनूस यांचे सरकार बरखास्त करतील. त्याऐवजी लष्करी देखरेखीखाली राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करतील, अशी चर्चा आहे.
लष्करप्रमुख वकार-उल-जमान यांनी लष्करी चौक्या आणि चौकांवर तैनाती वाढवल्यानंतर देशातील राजकीय परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी अधिकाऱ्यांनी बैठकीत देशात स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. बांगलादेशातील युनूस सरकारची स्थिती सतत कमकुवत होत चालली आहे. सरकारने जनतेचा आणि राजकीय पक्षांचा विश्वास गमावला आहे. लोकांचे उत्पन्न कमी होत आहे, रस्त्यावर निदर्शने वाढत आहेत. याशिवाय, देशात इस्लामिक कट्टरतावादाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारची विश्वासार्हता आणखी खराब झाली आहे.
देशात वाढत्या कट्टरपंथी घटकांना कसे नियंत्रित करायचे यावर बैठकीत चर्चा झाली. लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी इशारा दिला आहे की, हे अतिरेकी कायदा आणि सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देऊ शकतात. दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे पॅसिफिक कमांडचे वरिष्ठ जनरल जेबी व्हॅनव्हिल ढाका येथे आले. त्याच वेळी, बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस चीनच्या बहुप्रतिक्षित दौऱ्यावर जात आहेत.