मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी

लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅराग्लायडर आणि हॉट एअर फुगे उडवण्यास एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी (०३ एप्रिल) या संदर्भात माहिती दिली. ही बंदी ४ एप्रिलपासून लागू होईल.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश ४ एप्रिल ते ५ मे पर्यंत लागू राहील. दहशतवादी आणि असामाजिक घटकांपासून लोकांच्या सुरक्षेला धोका आहे. उडत्या वस्तूंवरील बंदीबाबतच्या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, दहशतवादी आणि समाजकंटक त्यांच्या हल्ल्यांमध्ये ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅराग्लायडर वापरू शकतात आणि व्हीव्हीआयपींना लक्ष्य करू शकतात, लोकांचे जीवन धोक्यात आणू शकतात, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू शकतात आणि मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *