अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिका दौऱ्यावर

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचल्या. हा दौरा २० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताचे कॉन्सुल जनरल श्रीकर रेड्डी कोप्पुला यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात ‘विकसित भारत २०४७’ या विषयावर भाषण देतील. गुंतवणूकदार आणि आयटी कंपन्यांच्या सीईओंना भेटतील. यानंतर, वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहे.

‘एक्स’ वर माहिती देताना अर्थ मंत्रालयाने लिहिले की, “अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आल्यावर, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांचे सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा, सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताचे कॉन्सुल जनरल डॉ. श्रीकर रेड्डी कोप्पुला आणि वित्त सचिव अजय सेठ यांनी स्वागत केले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *