पंतप्रधान पुरस्कारांचे आज वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे १७ व्या सार्वजनिक सेवा दिनानिमित्त लोकसेवकांना संबोधित करतील. यावेळी, त्यांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत.
पंतप्रधानांनी नेहमीच देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या कल्याणासाठी समर्पित राहण्यास, सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्ध राहण्यास आणि त्यांच्या कामात उत्कृष्टता प्राप्त करण्यास प्रोत्साहित केले आहे. यावर्षी पंतप्रधान जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास, आकांक्षापूर्ण गट कार्यक्रम आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये १६ सरकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करतील.
याद्वारे, सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच पंतप्रधान मोदी समग्र विकास आणि नवोपक्रमांवर ई-पुस्तके प्रकाशित करतील. त्यामध्ये प्राधान्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या यशोगाथा आणि नवोपक्रमांचा समावेश असेल.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *