रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा वर्धापनदिन साजरा

21Apr, 2025
मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला.
काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
विद्यापीठाच्या या वर्धापन दिन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, कौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.