म्हाडाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे महामंडळाच्या कामाचा आढावा  उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री तथा महामंडळाचे सहअध्यक्ष डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे. महाहौसिंगसारख्या महामंडळाने आपल्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात गृहनिर्माण करणे आवश्यक आहे. महामंडळाला या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. त्याचप्रमाणे घरांची विक्री करण्यासंदर्भात म्हाडामार्फत योग्य ती संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *