वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणमार्फत चर्चासत्र

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी चर्चासत्र घेण्यात आले. रुग्णसेवेत गुणवत्ता व औषध पुरवठ्यात गती साधण्यासाठी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर या चर्चासत्रात चर्चा झाली. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे कार्य अधिक गतिमान करण्यात यावे. जेणेकरून, रुग्णांना वेळेवर औषधे व वैद्यकीय सामग्री उपलब्ध होऊ शकेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांनी सांगितले.
यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड, महाव्यवस्थापक स्नेहल किस्वे , मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह यादव, महाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार जाधव यांच्यासह औषध व वैद्यकीय सामग्री उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात औषध साठवणूक करण्यासाठी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असून, प्राधिकरणाचे mmgpa.maharashtra.gov.in या संकेतस्थळामुळे उत्पादक कंपन्यांसाठी व्यवहार सुलभ होतील, असे निपूण विनायक यांनी सांगितले. औषध पुरवठादारांची मते जाणून घेण्यासाठी अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल औषध उत्पादक कंपनी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. महेश आव्हाड यांनी आभार मानले

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *