वेव्हजमधील साऊंडस ऑफ इंडिया कार्यक्रम उत्साहात

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘वेव्हज-२०२५’ समिटचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी स्पॉटीफाय यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साऊंडस ऑफ इंडिया’ या सांस्कृतिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘वेव्हेज २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे. ‘वेव्हेज २०२५’ ही केवळ एक परिषद नाही तर भारतीय सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, आधुनिक साऊंड आणि सांस्कृतिक विविधतेच्या अद्वितीय मिलाफामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संगीत दिग्दर्शक शंतनु मोईत्रा आणि त्यांच्या चमूने भारतातील विविध भागांमधील शेतातील पेरणी आणि कापणी संदर्भातील लोकगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी सोनटक्के यांनी केले.