अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल

अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्विस लॉरेन्को आज भारत दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

जोआओ मॅन्युएल गोन्काल्विस लॉरेन्को यांनी राजघाट येथे महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण केला. दरम्यान,  त्यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत आणि अंगोलाच्या द्विपक्षीय संबंधांच्या ४० वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत. भारत व अंगोला या दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधांसाठी जोआओ मॅन्युएल गोन्काल्विस लॉरेन्को यांची भारतभेट महत्त्वाची आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *