महाराष्ट्र राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विविध बँका व विमा कंपन्यांशी भारतीय संविधान ( सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने चर्चा केली.
मुंबईच्या ताज हॉटेल येथे समांतर निवडणुकीसंदर्भात लोकसभा सदस्य पी.पी.चौधरी, लोकसभा सदस्य धर्मेंद्र यादव, राज्यसभा सदस्य घन:श्याम तिवारी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या समितीने राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समांतर निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व प्रशासकीय परिणामांवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी समितीला आश्वासन दिले की, सखोल अभ्यास केला जाईल. विशेषतः शिक्षण क्षेत्रावर एकत्रित निवडणुकांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती समितीला दिली जाईल.
यानंतर, समितीने एकत्रित निवडणुकांच्या घटनात्मक, आणि इतर बाबींवर चर्चा केली.