शस्त्रखरेदीसाठी लष्कराला निधी मिळणार

भारतीय लष्कर पाळत ठेवणारे ड्रोन, अत्याधुनिक प्राणघातक ड्रोन, लांब पल्ल्याची प्राणघातक शस्त्रे, तोफखान्यासाठी दारूगोळा, विविध प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि आपत्कालीन अधिकारांतर्गत क्षेपणास्त्रे आणि रॉकेट यांसारखी उपकरणे खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी संरक्षण दलांना सुमारे ४०,००० कोटी रुपयांची मोठी मदत मिळणार आहे, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अलिकडेच संरक्षण अधिग्रहण परिषदेने त्यांच्या बैठकीत आपत्कालीन अधिकारांतर्गत या अधिग्रहणांना मान्यता दिली. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

लष्कराने पाकिस्तानमधील लक्ष्यांवर ‘ब्राह्मोस’ आणि ‘स्कॅल्प’ क्रूझ क्षेपणास्त्रे डागली होती. ज्या उपकरणांसाठी करार केले जात आहेत, ते सुरक्षा दलांना आपत्कालीन अधिकारांतर्गत निर्धारित वेळेत मिळवावे लागतील.संरक्षण वित्त शाखेच्या आर्थिक सल्लागारांच्या मदतीने खरेदीचे काम सैन्याकडून केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *