मंत्रालयात गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन

20May, 2025
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 21 मे पर्यंत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.
महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. या चित्रप्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रदर्शनात संत परंपरा, समाजसुधारणा चळवळी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे.