सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या मुंबई तसेच राज्यातील अन्यत्र दौऱ्यावेळी राजशिष्टाचाराचे पालन होण्यासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना ‘कायमस्वरुपी राज्य अतिथी‘ म्हणून घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम, २००४ नुसार यापुर्वीपासून घोषित राज्य अतिथी असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या दौ-यादरम्यान निवास, वाहन व्यवस्था व सुरक्षा, इ. पुरवण्यात येतात. अशा सर्व सुविधा त्यांना राज्यात सर्वत्र दौऱ्यादरम्यान अनुज्ञेय राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.