बियाणांसाठी साथी पोर्टलचा वापर करण्याचे शासनाचे आदेश

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना बियाणे वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘साथी (Seed Authentication, Traceability and Holistic Inventory)’ या डिजिटल पोर्टलचा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार, आता बियाणे उत्पादक, वितरक, व्यापारी आणि कृषी सेवा केंद्रांना ‘साथी’ पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. बियाण्यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री यासंबंधीची सर्व माहिती या पोर्टलवर अद्ययावत ठेवावी लागणार आहे.
‘साथी’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य सर्व बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना पोर्टलवर युजर आयडी तयार करून कार्यपद्धतीनुसार माहिती भरावी लागणार. बियाण्यांची ट्रॅसेबिलिटी कोणते बियाणे कोणत्या शेतकऱ्याला विकले गेले, याचा संपूर्ण डेटा उपलब्ध होणार. शेतकऱ्यांना थेट लाभ गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे मिळण्याची खात्री, आणि अनधिकृत/बनावट बियाण्यांपासून संरक्षण. प्रशासनाकडून निगराणी जिल्हास्तरावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत वितरणाची तपासणी शक्य होणार.
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावी. खरेदी करताना ‘साथी’ पोर्टलवर नोंद झालेल्या पावत्यांची मागणी करावी आणि गरज भासल्यास स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ‘साथी’ पोर्टलबाहेरून कोणतीही विक्री झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.