
स्वयंपाकगृहातील बेसीन स्वच्छ असावे, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. अनेकदा यामधून हळूहळू पाणी जाते किंवा पाणी जाताना वेगळाच ‘बुड बुड’ असा आवाज येत असतो. ही तुमच्या किचनमधील समस्या आहे. तर या घरगुती उपायांनी यावर मात करा. अगदी रोजच्या वापरातील या सोप्या उपायांनी किचनमधील बेसीन साफ करा .
१ लहान तुकडा भांड्याचा साबण, अर्धा कप बेकिंग सोडा,२ कप व्हिनेगर हे एकामागोमाग एक घालून बेसीनचे तोंड कपड्याने बंद करा.१० मिनिटांनी यावर गरम पाणी ओता. अवघ्या काही सेकंदात बेसीन साफ होईल.

लिंबू आणि इनो त्यांच्या आम्लीय स्वभावामुळे बेसीन स्वच्छ करण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस आणि इनो एकत्र करून ठेवा. काही वेळाने हे द्रावण बेसीनमध्ये ठेवा. स्पंजने घासून घ्या. यामुळे बेसीन स्वच्छ होईलच, पण दररोज भांडी साफ केल्यानंतर या द्रावणाने साफ केल्यास स्वयंपाकघरातील बेसीन कधीही समस्या निर्माण करणार नाही.