सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • स्वत:चा मेहंदी व्यवसाय सुरु करा

स्वत:चा मेहंदी व्यवसाय सुरु करा

by सह्याद्री मराठी वृत्त 15 March 2023 0 Comments
15Mar, 2023

मेहंदीने आकर्षक सजवलेले हात म्हणजे तरुणींसाठी आनंदच असतो. मेहंदी रेखाटनाची कला आणि आवड असल्यास आपण स्वत: चे मेहंदी पार्लर सुरु करू शकता. कोणताही व्यवसाय हा त्याच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आपल्या पार्लरचे नाव हे सगळ्यांपेक्षा वेगळे असायला हवे. नावामुळेच लोक जास्तीत जास्त आकर्षित होतात. यासोबतच आपल्या या व्यवसायाच्या नावाचा लोगो तयार करणे आवश्यक असते. लोगोच्या मदतीने आपण पार्लरची जाहिरात करू शकता; किंवा समाजमाध्यमांवर जाहिरात करू शकता. जर आपण मेहंदीचा व्यवसाय घरातूनच करत असाल तर खूपच छान ! पण जर घराच्या बाहेर मेहंदी पार्लर सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एखादे छानसे दुकान भाड्याने घ्यावे लागेल. दुकान घेताना हे लक्षात असू द्या, दुकान बाजारात असायला पाहिजे, जिथे खूप साऱ्या महिला येत असतील. म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी हवे. लोकांना माहीत झाले तरच तुमचा व्यवसाय चालू शकतो.

मेहंदी काढणे ही एक कला आहे. या कलेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे; कारण मेहंदी काढण्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मेहंदीच्या सर्व नक्षीकामां बद्दल माहिती असायला हवी. तुम्ही जेवढी सुंदर मेहंदी काढाल, तेवढा तुमच्या व्यवसायाचा प्रचार जास्त होईल. प्रत्येक देशानुसार मेहंदीचे खूप सारे प्रकार आहेत. आपण लोकांच्या आवडीनुसार मेहंदी नक्षीकाम करू शकता. मेहंदीचे प्रकार याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. यात भारतीय मेहंदी, पारंपरिक मेहंदी, वधू मेहंदी, पाकिस्तानी मेहंदी,अरेबिक मेहंदी, मोरोक्कन मेहंदी, वेस्टर्न मेहंदी, इंडो वेस्टर्न मेहंदी,आफ्रिकन मेहंदी, इंडो अरेबिक मेहंदी हे काही प्रकार आहेत.

मेहंदी पार्लर व्यवसाय घरातूनच करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण यामध्ये तुमची कला आणि मेहंदी लावण्यासाठी लागणारे मेहंदी कोन एवढेच लागणार आहे. जर तुम्ही मेहंदी पार्लर शॉप उघडणार असाल तर त्यासाठी तुम्हाला दुकानाचे भाडे आणि दुकानासाठी डिपॉझिट भरावे लागेल. साधारणतः मेहंदी काढण्याच्या व्यवसायातून तुम्ही महिना वीस ते तीस हजार रुपये कमवू शकता. आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सुरुवातीला मेहंदी रेखाटनाचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमावर अपलोड करू शकता. 

Next
वीजबिल वसूलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती नाही
March 15, 2023
Previous
फळ प्रक्रिया उद्योग
March 15, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to स्वत:चा मेहंदी व्यवसाय सुरु करा?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !