मारुती सुझुकी ब्रेझाची नोंदणी सुरु

‘मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी’ भारतात प्रदर्शित करण्यात आली आहे. खुप दिवसाच्या उत्सुकतेनंतर अखेर मारुती सुझुकीने ‘ब्रेझा’ ची ‘फॅक्ट्री फिटेड एस’ सीएनजी तंत्रज्ञानासोबत आणली आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ९.१४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ‘ब्रेझा सीएनजी’ चे मायलेज २५.५१ किमी-प्रति किलो आहे. ‘ब्रेझा सीएनजी’ भारतीय बाजारपेठेमध्ये ‘टाटा नेक्सॉन’ आणि ‘ह्युंदाई वेन्यू’ सारख्या पॉप्यूलर एसयूव्हीसाठी सर्वात मोठे तगडे आव्हान असणार आहे.

‘मारुती ब्रेझा एलएक्सआय एस-सीएनजी’ व्हेरिएंटची किंमत ९.१४ लाख रुपये आहे. ‘मारुती ब्रेझा व्हीएक्सआय एस-सीएनजी’ व्हेरिएंटची किंमत १०.४९ लाख रुपये आहे. ‘मारुती ब्रेझा झेडएक्सआय एस-सीएनजी’ व्हेरियंटची किंमत ११.८९ लाख रुपये आहे. ‘मारुती ब्रेझा झेडएक्सआय एस-सीएनजी डुअल टोन’ व्हेरियंटची किंमत १२.०५ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीमध्ये ‘के15 सी’ स्मार्ट हायब्रिड 1.5 लीटर पेट्रोल इंजिन सोबत एस- सीएनजी तंत्रज्ञान दिले आहे, जी 87.8 पीएस पर्यंत मॅक्सिमम पॉवर आणि 121.5 एनएमचे पिक टॉर्क जनरेट करते. ब्रेझा सीएनजीचे मायलेज 25.51 किमी/ ली. आहे. मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच याची डिलिव्हरीसुद्धा केली जाणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *