सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • अळंबी

अळंबी

by सह्याद्री मराठी वृत्त 22 March 2023 0 Comments
22Mar, 2023

अळंबी शेती हा मुळात बुरशी पिकविण्याचा व्यवसाय आहे. आज अळंबीची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे; कारण, अल्पावधीत तो शेतकर्‍यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करीत आहे. अळंबीची लागवड ही भारतातील पैशाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतकरी करतात. अळंबी खायला चविष्ट असतात. आपण याचे सूप, भाज्या बनवू शकतो. आपल्या आवडत्या पिझ्झावर ते वापरू शकतो. अळंबी शेती केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही तर निर्यातीसाठीही ही शेती केली जाते. त्यासाठी आपल्याला थोडी जागा किंवा जमीन असणे आवश्यक आहे, जे लोक भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक आहेत ते एखादी खोली भाड्याने घेऊन ही शेती करू शकतात.

अळंबी शेतीचे उत्पादन सूर्यप्रकाशाशिवाय, सेंद्रिय खतावर आणि सुपीक माती शिवाय याची वाढ होते. अळंबी शेतीमध्ये उत्पादन देण्याची प्रचंड क्षमता आहे. ही शेती करण्यासाठी आपण वरचा मजला किंवा मोकळ्या हवेच्या खोलीत देखील ह्याची सुरुवात करू शकता. अळंबी शेती करण्यासाठी आपल्याला कमी जागा लागते, आपण 20 X 20 फूट जागेच्या खोलीत याची सुरुवात करू शकता. आठवड्याला कमीत कमी 50 किलो उत्पादन काढू शकता. हा एक असा व्यवसाय आहे की तुम्ही कमी आठवड्यात पैसे कामवायला सुरुवात करू शकता. आपल्याला जर आणखी या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर एखादी खोली भाड्याने घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकता.

अळंबी शेती करण्यासाठी माहिती करून घेणे गरजेचे आहे. अळंबी शेती करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि अनुभव असणे आवश्यक आहे, यासाठी आपण ऑनलाइन किवा एखाद्या कृषी विभागाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेऊ शकता.तसेच आपण जे जुने अळंबी व्यवसाय आहेत, त्याठिकाणी जाऊन याविषयी माहिती करून घेऊन शकता. याचे प्रशिक्षण घेत असताना आपल्याला अळंबी पिकविण्याचे तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. या व्यवसायासाठी पेंढा आणि अंडी, 400 गेज जाडीची प्लास्टिक शीट, लाकडी साचा, पेंढा कापण्यासाठी हँड चॉपर, किंवा चाफ कटर, पेंढा उकळण्यासाठी ड्रम (किमान दोन), ज्यूट दोरी, नारळ दोरी, किंवा प्लास्टिक दोरी, गोणी पिशव्या, स्प्रेअर, स्ट्रॉ स्टोरेज शेड हे साहित्य लागते.

अळंबी वाढविण्यासाठी सामान्यतः भूसा किंवा लाकूड पॅलेट वापरतात. अळंबी ला आवडणारा ‘सब्सट्रेट’ बनविण्यासाठी, तुम्हाला सेंद्रिय सॉफ्टवुड इंधन गोळ्या, लाकूड चिप्स आणि ‘सोया हल्स’ खरेदी करावे लागतील. मग तुम्हाला हे दोन घटक ‘बायोडिग्रेडेबल’ पिशवीत मिसळावे लागतील, आणि नंतर योग्य आर्द्रता मिळविण्यासाठी पाणी घालावे लागते.आपण घरामध्ये किवा बाहेर या दोन्ही ठिकाणी अळंबीची वाढ करू शकतो. ‘वाइल्ड मशरूम’ हे फायदेशीर आणि वाढण्यास सोपे आहेत आणि त्यांचे काही औषधी फायदे देखील आहेत.

आज मार्केटमध्ये बटन अळंबीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे या प्रकारची शेती करण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत. जगभरातील अधिकाधिक सुपरमार्केट आणि किराणा माल ‘पिंक ऑयस्टर मशरूम’ सारख्या विदेशी अळंबीचा साठा करत आहेत. अळंबी मध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मशरूम नाजुक असतात, त्यासाठी त्याची हाताळणी आणि काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे. याची वाहतूक करीत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. आज मोठ्या प्रमाणावर अळंबीची मागणी आहे, मात्र अळंबीचा पुरवठा कमी आहे. आपल्याकडे उत्पादन जास्त असल्यास ग्राहक आपल्याला जास्त दर देऊन खरेदी करण्यासाठी मागे लागतात. याचे आपण ‘ऑनलाइन शॉप’ देखील उघडून उत्पादन विकू शकतो.

Next
डोळ्यात पाणी आणणारा कांदा
March 22, 2023
Previous
पोहे प्रक्रिया उद्योग
March 22, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to अळंबी?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !