शिवछत्रपतींचा आवडता किल्ले रांगणा
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ‘किल्ले रांगणा’ उर्फ ‘प्रसिद्धगड’ वसलेला आहे. सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, परंतु घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात,…