राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा
राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. त्याचबरोबर तमिळनाडूमधील ‘जल्लीकट्टू’ आणि कर्नाटकातील ‘कंबाला’ या क्रीडा प्रकारांवरची बंदीही सर्वोच्च न्यायालयाने हटवली. हा निर्णय देताना जनावरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या क्रीडाप्रकारांच्या संदर्भातील महाराष्ट्र,…