हनुमंताचे जन्मस्थान अंजनेरी किल्ला
नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेतील ‘अंजनेरी’ हा किल्ला पवनपुत्र हनुमंताचे जन्मस्थान मानला जातो. हा किल्ला नाशिकपासून त्र्यंबक रस्त्याने २० किमीच्या अंतरावर आहे. हे स्थानिक नाशिककरांसाठी खास पावसाळ्यातील प्रसिद्ध ‘ट्रेकिंग स्पॉट’ बनले आहे. ‘अंजनेरी’ हे हनुमंताचे जन्मस्थान असून हनुमंताची आई ‘अंजनी’ च्या नावावरून पडले असे म्हणतात. रघुनाथराव पेशवे उर्फ…